शबनम न्यूज | प्रतिनिधी
सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन बारामती हॉस्टेल, पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ व भारत नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योग व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दिनदर्शिकेत टी. डी. एस., ई. एस. आय., जी. एस. टी. रिटर्न, प्रॉव्हिडंट फंड वर्गणी भरणा यासारख्या महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्व जाती-धर्मांचे सणवार, तिथी, थोर समाजसेवकांच्या जयंती व पुण्यतिथी यांची माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे.
ही दिनदर्शिका लघुउद्योग व्यावसायिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन सुलभ करण्यास उपयुक्त ठरणार असून, उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


