spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पाठिंबा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत विकास आणि सोसायटीधारकांचे हित लक्षात घेता येणाऱ्या मनपा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार लांडगे यांच्यासोबत फेडरेशनच्या कोअर टीमची बैठक नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

फेडरेशनकडून शहरातील तब्बल १२८ ठिकाणी “आमदार महेश लांडगे हाच उमेदवार” या भावनेतून समर्थन व्यक्त करण्यात येत आहे. सोसायटीधारकांच्या विविध प्रश्नांवर आमदार लांडगे यांनी सातत्याने सकारात्मक आणि सक्रिय भूमिका घेतल्यामुळेच हा पाठिंबा देण्यात आल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी याबाबत अधिकृत घोषणा करताना सांगितले की, “शहरातील हाऊसिंग सोसायट्यांशी संबंधित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पार्किंग, मालमत्ता कर आदी प्रश्नांवर आमदार महेश लांडगे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत फेडरेशन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.”

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांमधील मतदारसंख्या ही निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता असून, फेडरेशनच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न केवळ ऐकून न घेता ते सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रत्यक्ष कृती केली आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, कर आकारणी, पार्किंग आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. सोसायटीधारकांचे हित जपणारे नेतृत्व म्हणूनच आगामी मनपा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आमदार महेश लांडगे यांना ठाम पाठिंबा देत आहे.”

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!