शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधून अतिश बारणे यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरत आपला प्रचार सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात अतिश बारणे यांनी प्रभागातील विविध भागांत गाठीभेटी घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.
घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत असताना मतदारांकडून त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिलांसाठी सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांवर अतिश बारणे यांनी ठोस आणि व्यवहार्य उपाययोजना राबवण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये “प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध असणारा उमेदवार” अशी अतिश बारणे यांची ओळख असल्याने त्यांच्या प्रचाराला वेगळीच ऊर्जा मिळताना दिसत आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा वाढता सहभाग हा त्यांच्या प्रचाराची ताकद ठरत आहे.
प्रभाग क्र. २ मधील विकासकामांना गती देणे, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख प्रशासन हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे अतिश बारणे यांनी यावेळी स्पष्ट केले. एकूणच, प्रभाग क्रमांक २ मध्ये अतिश बारणे यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता निवडणूक लढतीत ते मजबूत दावेदार मानले जात आहेत.



