पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १५ मधून शिवसेना पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटिका सौ. सरिता अरुण साने यांनी जोरदार मुसंडी मारली असून त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, महिलांचा प्रचंड पाठिंबा आणि तरुणांचा सक्रिय सहभाग पाहता सरिता ताई साने या प्रचारात स्पष्टपणे आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घराघरांत जाऊन थेट मतदारांशी संवाद साधताना सरिता साने विकासकामांचा ठोस आराखडा, प्रभागातील मूलभूत समस्यांची जाण आणि त्या सोडवण्यासाठीची ठाम भूमिका मांडत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांवर त्यांचा भर असून नागरिक त्यांच्या कार्यशैलीवर समाधान व्यक्त करत आहेत.

विशेषतः महिलांमध्ये सरिता ताई साने यांच्याविषयी आपुलकी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपल्याच घरातील लेक” म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहत असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सक्षमपणे लढतील, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रचारादरम्यान मिळणारा वाढता पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनेची पकड अधिक मजबूत होत आहे. एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि ताकदीच्या उमेदवार म्हणून सरिता अरुण साने यांचे नाव आता प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत असून निवडणुकीत त्या प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.


