
शबनम न्यूज | प्रतिनिधी
निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रियांकाताई बारसे यांना ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद आणि मायेची थाप हीच त्यांच्या ताकदीचे प्रतीक ठरत आहे.
“आपल्याच कुटुंबातील लेक निवडणुकीला उभी आहे,” अशी भावना प्रत्येक घराघरात व्यक्त होत असून, या आपुलकीच्या नात्यामुळे प्रियांका बारसे यांच्या प्रचाराला सामान्य कुटुंबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. केवळ राजकीय उमेदवार म्हणून नव्हे, तर आपल्या घरातील सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने मतदारांशी भावनिक नाते अधिक दृढ झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा सन्मान, महिलांप्रती संवेदनशीलता आणि सामान्य कुटुंबांच्या प्रश्नांविषयीची जाण-या बाबी प्रियांका बारसे यांच्या प्रचारात ठळकपणे जाणवत आहेत. त्यामुळेच प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना आशीर्वाद, विश्वास आणि साथ मिळत असून, हीच ताकद त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक बळकट करत असल्याचे दिसून येत आहे.



