थेरगावमध्ये पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील गणेश कॉलनी व बेलठिका नगर येथे दीर्घकाळापासून खचलेले व घुशीने पोखरलेले गटाराचे गट्टू व पाईप्स नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होते. या परिसरात वारंवार खड्डे पडत असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर समस्येची दखल घेत सौ. नम्रता ताई रवी भिलारे यांच्या वतीने संपूर्ण परिसरातील खराब झालेले गट्टू व पाईप्स बदलून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. चेंबरचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्याने नागरिकांनी तात्काळ तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत नम्रता ताई भिलारे यांनी प्रभागातील चेंबर व गटारांच्या दुरुस्तीबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या स्थापत्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करत पुन्हा मजबुतीने दुरुस्ती करण्यात आली. खराब झालेले गटार, चेंबर व रस्त्यावरील खड्डे बुजवून परिसर सुरक्षित करण्यात आला. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्न सुटला असून दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत झाली आहे.
या कामामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “तक्रार केल्यानंतर लगेच काम झाले, हीच लोकप्रतिनिधींची खरी सेवा आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी नम्रता ताई भिलारे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. स्थानिक नागरिकांनी भविष्यातही अशाच पद्धतीने परिसरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली आहे.
सार्वजनिक सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा नम्रताई भिलारे यांचा प्रयत्न थेरगाव परिसरासाठी दिलासादायक ठरत आहे.


