spot_img
spot_img
spot_img

वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची बाजी

शबनम न्यूज

राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सुरुवातीचे कल स्पष्ट होऊ लागले असून, राज्यातील पहिला निकाल वडगाव मावळ नगरपंचायतीतून समोर आला आहे.

या पहिल्याच निकालात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी बाजी मारली आहे.

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या नगरसेवक पदावर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही निवडणूक अवघ्या एका मताच्या फरकाने जिंकत चुरशीचा सामना आपल्या बाजूने वळवला.

सुनीता ढोरे या प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण 323 मते मिळाली, तर त्यांनी भारतीय जनता पक्षच्या उमेदवार पूजा अतिश ढोरे यांचा पराभव केला.

या नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या एकूण 17 जागांसाठी प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी थेट लढत पाहायला मिळाली. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत तिरंगी झाल्याचेही चित्र होते.

राज्यातील पहिलाच निकाल राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याने, आगामी निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!