शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर येथे प्रियांका ताई बारसे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून, महादेवनगर, संभाजीनगर, राष्ट्रप्रेमनगर व परिसरामध्ये घरोघरी जाऊन परिचय पत्रकांचे वाटप करत त्या नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
या प्रचारादरम्यान प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आपुलकीने संवाद साधण्याची, नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याची संधी मिळाल्याने मनाला समाधान मिळाल्याचे मत प्रियांका ताई बारसे यांनी व्यक्त केले. नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि विश्वास हा पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा उपक्रम केवळ पत्रक वाटपापुरता मर्यादित नसून, नागरिकांशी नातं जोडण्याचा, विश्वास निर्माण करण्याचा आणि जनसेवेची खरी सुरुवात तळागाळातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या विश्वासावरच सक्षम आणि प्रभावी सेवा उभी राहते, आणि तो विश्वास जपण्याचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे प्रियांका ताई बारसे यांनी यावेळी सांगितले.
एकूणच प्रभाग ५ मध्ये सुरू असलेला हा घरोघरी संवाद नागरिकांच्या सहभागामुळे अधिक बळकट होत असून, प्रचाराला वेग येताना दिसत आहे.



