शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका प्रवीण बारसे यांचा प्रचार जोमात सुरू असून, या प्रचारादरम्यान मतदारांच्या हस्ते त्यांच्या २०२६ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आदर्श शिक्षण संस्था, दिघी रोड भोसरी यांच्या सौजन्याने साकार झालेली ही दिनदर्शिका प्रियांका बारसे यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची सविस्तर ओळख करून देणारी आहे. तुकाई मातेच्या मंदिरात विधीवत पूजन करून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला प्रियांका बारसे यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व महिला कार्यकर्त्या, बारसे परिवार तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिनदर्शिकेमधून त्यांच्या कार्याचा आढावा घेत, पुढील काळातही विकासकामांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, नागरिकांमध्ये प्रियांका बारसे यांच्या कार्याबाबत सकारात्मक चर्चा रंगताना दिसत आहे.



