शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून प्रभाग क्रमांक २३ मध्ये नम्रता ताई रवीदादा भिलारे यांच्या प्रचाराने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
नम्रता ताई भिलारे यांनी घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि मतदारांच्या अडचणी समजून घेण्यावर भर दिला आहे. या संवादातून प्रभागातील नागरिकांचा रोष स्पष्टपणे समोर येत असून, अनेक वर्षांपासून प्रभागाचा विकास ठप्प असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रभागात रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, वीज समस्या, स्वच्छतेचा अभाव यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “फक्त आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष काम झाले नाही,” अशी खंत मतदार व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ च्या सर्वांगीण विकासासाठी नम्रता ताई रवीदादा भिलारे या एकमेव सक्षम आणि विश्वासार्ह उमेदवार असल्याचा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विकासाभिमुख दृष्टीकोन, नागरिकांशी थेट संवाद आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या जोरावर यावेळी बदल अटळ असून, नम्रता ताई भिलारे यांनाच महानगरपालिका सभागृहात पाठविणार, असा निर्धार मतदारांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रभाग २३ मध्ये सध्या परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून येत असून, येणारी निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढली जाणार, हे चित्र ठळकपणे समोर येत आहे.




