विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांच्या निवडणूक प्रचाराला प्रभाग क्र. २३ मध्ये वेग आला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मांडत त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक मतदार स्वतः पुढाकार घेत प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभागातील रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांसह विकासाभिमुख कामांना गती देणे ही काळाची गरज आहे. ही निवडणूक प्रभागाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याची जाणीव मतदारांमध्ये असून, मनीषा ताई यांच्या नेतृत्वाखालीच प्रभागाचा विकास साध्य होऊ शकतो, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. याच विश्वासातून नागरिकांचा सक्रिय सहभाग प्रचारात पाहायला मिळत आहे.
गुरुनानक कॉलनी, एकता कॉलनी, समता कॉलनी परिसरात शनिवारी झालेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या दौऱ्यात कांताबाई यादव, मंजूताई गुप्ता, भारतीताई हुलगे, कुचेकरताई, सुजाता ताई पवार, राधादेवी साहानी, बेबीताई दिगंबर पवार, आकाश शेलार, विनोद भाऊ पवार, प्रकाश देवनगाव, सनी डोळस, आदित्य देवराम, मंजू कांबळे, सुजित कांबळे, विनोद मिरगणे, रवि आरेकर, अनिल सूर्यवंशी, किरण शिंदे, सुमित बनसोडे, नितीन देवकाते, राहुल आखाडे, जहांगीर शेख, आकाश गायकवाड, विशाल गायकवाड, विनू कांबळे, संभाजी आरसुळे, सनी पारखे, प्रेम पवार, श्याम केदारी, मलंग शेख, जावेद भाई शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, विकासकेंद्री विचारधारा, नागरिकांशी थेट संवाद आणि व्यापक सहभाग यामुळे प्रभाग क्र. २३ मध्ये निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले असून, मनीषा प्रमोद पवार यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.



