spot_img
spot_img
spot_img

वाल्हेकरवाडीतील रस्त्यांच्या कामाला गती; नागरिकांमध्ये समाधान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे प्रभाग क्रमांक १७ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्यांच्या वतीने प्रभागात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रचारासोबतच प्रभागातील प्रलंबित नागरी प्रश्न सोडविण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

याच अनुषंगाने वाल्हेकरवाडी गावठाण परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत भाऊसाहेब भोईर यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, आज त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामाची पाहणी केली.

खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. “विकासकामे केवळ आश्वासनापुरती न राहता प्रत्यक्षात उतरली पाहिजेत,” अशी भूमिका भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी मांडली.

प्रचारादरम्यान त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, रस्ते, स्ट्रीट लाईट, तसेच सुरक्षितता यांसारख्या प्रश्नांवर चर्चा केली. प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना तत्काळ न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक मतदारांचा भाऊसाहेब भोईर यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, त्यांच्या अनुभवावर आणि कामाच्या पद्धतीवर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. येत्या काळात प्रभागातील उर्वरित प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!