शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारास मोजकेच दिवस उरले असताना, प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर येथे सर्वसाधारण गटातील महिला उमेदवार प्रियांका बारसे यांनी प्रचाराला चांगलीच गती दिली आहे. दिवस असो वा रात्र, त्या सातत्याने मतदारांच्या गाठीभेटी घेत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रचाराच्या प्रत्येक फेरीत स्थानिक नागरिकांकडून परिसरातील समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचना प्रियांका बारसे लक्षपूर्वक ऐकून घेत आहेत. या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा विश्वास त्या मतदारांना देत असून, त्यामुळे प्रचाराला अधिक बळ मिळत आहे. महिलांच्या न्याय व हक्कांसाठी यंदा मतदान फक्त प्रियांका ताईंनाच करण्याचा निर्धार ‘नवदुर्गा’ महिलांनी व्यक्त केल्याचे चित्र प्रभागात पाहायला मिळत आहे.
प्रचारादरम्यान जागोजागी औक्षण व सत्कार करत नागरिकांकडून प्रियांका बारसे यांचे स्वागत केले जात आहे. या सन्मानामुळे प्रचार अधिक जोमाने पुढे सरकत असून, महिला कार्यकर्त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहून प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत.
विशेष म्हणजे, या महिला कार्यकर्त्या बहुतांश सर्वसामान्य गृहिणी असून, “प्रियांका बारसे निवडून याव्यात आणि पुढील पाच वर्षे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावेत,” असा ठाम विश्वास त्या व्यक्त करत आहेत. एकूणच, प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रियांका बारसे यांच्या प्रचाराने आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.




