पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील विविध गृहनिर्माण सोसायटींना भेटी देत सौ. अनिताताई संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान सोसायटीतील पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची सविस्तर नोंद घेत अनिताताई काटे यांनी आश्वासक प्रतिसाद दिला. “नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्राधान्याने सोडवणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे, हाच माझा संकल्प आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. विकासाभिमुख व लोकहिताच्या दृष्टीने पारदर्शक कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले.
या संवादात्मक भेटींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर समस्या ऐकून घेणाऱ्या नेतृत्वाबाबत विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.




