spot_img
spot_img
spot_img

महिलेला बॅटने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

शबनम न्यूज : प्रतिनिधी

पिंपरी : मुलीला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला बॅटने मारहाण करून हात फॅक्चर केला. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १०) सायंकाळी संदीपनगर, थेरगाव येथे घडली.

 

अनिल कांबळे आणि दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीपनगर, थेरगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने शुक्रवारी याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा लहान मुलगा आहे. संशयितांची लहान मुले आहेत. मुलांना शिवीगाळ करण्याच्या कारणावरून फिर्यादी यांची मुलगी हिला संशयितांनी शिवीगाळ करून हातांनी मारहाण केली होती. त्यानंतर सायंकाळी तक्रारदार महिला या संशयिताच्या घरासमोर जाऊन संशयित यांना मुलीला का मारहाण केली, अशी विचारणा केली. त्यावेळी दोन महिला संशयितांनी पुन्हा फिर्यादी व त्यांची मुलगी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच संशयित अनिल कांबळे हा घरातून बॅट घेऊन बाहेर आला. त्याने बॅटने तक्रारदार महिलेला मारहाण केली. यामुळे त्यांचा डावा हात फॅक्चर झाला. तसेच फिर्यादी यांच्या मुलीच्या डाव्या हातावर व कमरेवर बॅटने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या साक्षीदार यांनाही बॅटने मारहाण केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!