कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पिंपरी, चिंचवड, निगडी, दापोडी, भोसरी परिसराचा समावेश
शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणांहून मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये लाखो अनुयायी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येतात आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. या दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच हा उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी पिंपरी, दापोडी, भोसरी, चिंचवड व निगडी परिसरातील वाहतुकीत सोमवारी (ता. १४) बदल करण्यात येणार आहे. हा बदल सोमवारी दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत असेल.
जसा असेल बदल
चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सेवा रस्त्याने वाहतूक बंद: पर्यायी मार्ग डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे जाता येईल
■ नाशिक फाटयाकडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सेवा रस्त्याने वाहतूक बंद : पर्यायी मार्ग डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एच पी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मार्गे पुढे जाता येईल.
■ स्व. इंदिरागांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे वाहतूक बंद पर्यायी मार्ग मोरवाडी चौक मार्गे जाता येईल,
नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी चौकाकडे वाहनांना प्रवेश बंद: पर्यायी मार्ग – रहिवाशांच्या वाहनांव्यतिरीक्त इतर मार्गावरील वाहने एच ए कॉर्नर बस थांबा येथून मासुळकर कॉलनीमार्गे जातील.
■ नेहरूनगर चौकाकडून/एच ए कॉर्नरकडून गांधीनगर कॉर्नर येथून पिंपरी चौकाकडे वाहनांना प्रवेश बंद : पर्यायी मार्ग – नेहरूनगर कडून येणारी वाहतूक एच कॉर्नर येथून उजव्या बाजूस वळून रसरंग चौकातून
पार्किंगचे नियोजन
* येथे असेल पार्किंगची व्यवस्था-पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एच.ए. ग्राउंड येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
जाईल.
* जयमल्हार खानावळ सम्राटचौकपासून मोरवाडी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद पर्यायी मार्ग रसरंग चौकाकडून येणारी वाहतूक सम्राट चौकातून उजव्या बाजूस वळून जुने मोरवाडी न्यायालय या मार्गे इच्छित स्थळी जाईल.
पीसीएमसी आऊटगेट येथे बॅरीगेट लावून जुन्या महामार्गावर येणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद : पर्यायी मार्ग – गांधीकॉर्नर या ठिकाणाहून यु-टर्न घेऊन एच ए कॉर्नर, रसरंग चौक मार्गे जात येईल,
सायन्स पार्ककडून मोरवाडी चौकाकडे येणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद पर्यायी मार्ग सायन्स पार्क/ऑटो क्लस्टरकडून येणारी वाहतूक सेंट मदर तेरेसा पूलमार्गे जाईल.
क्रोमा शोरुमकडून गोकूळ हॉटेलकडे जाणारा मार्ग बंद : पर्यायी मार्ग – मोरवाडी चौकाकडून पिंपरी पुलामार्गे जाता येईल. (या पुलावर एका दिवसासाठी दुतर्फा वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.)
■ पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक गोकूळ हॉटेल येथे आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग पिंपरी चौक, मोरवाडी चौक मार्गे जात येईल.
हॅरिस पूल ते फुगेवाडी चौक सेवा रस्त्याने जाण्यास वाहनांना प्रवेश बंद: हॅरिस पुलावरून ग्रेडसेपरेटर मार्गे जाता येईल.
बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छत्रपती शिवाजी
महाराज पुतळा येथे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद : पर्यायी मार्ग हॅरिस पूल दापोडी मार्गे जात येईल.
■ शितळादेवी चौकाकडून दापोडी गावाकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद : शितळादेवी चौकाकडून सांगवी मार्गे जात येईल.
■ जायका चाय येथून भोसरी पीएमटी चौकाकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद: या मार्गावरील वाहने भोसरी उड्डाणपूल मार्गे जातील.
■ निगडित भक्ती शक्ती उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेने जाण्यास जड अवजड वाहनांना प्रवेश बंद : या मार्गावरील वाहने भक्ती शक्ती सर्कल – अंकुश चौक चिकन चौक त्रिवेणीनगर चौक- दुर्गानगर चौक थरमॅक्स चौक केएसबी चौक- भोसरी मार्गे जातील.
■ मॅगझीन चौक- दिघी बोपखेल फाटामार्गे पुणे शहर हद्दीत जाणाऱ्या चारचाकी व जड अवजड वाहनांना प्रवेश बंद: या मार्गावरील वाहने मॅगझीन चौकयेथून उजवीकडे वळून भोसरी मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच, मार्गावरील वाहने मॅगझीन चौक येथून डावीकडे वळून अलंकापुरम चौकमार्गे जातील.
चिंचवडमधील लोकमान्य हॉस्पिटल चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद: पर्यायी मार्ग लोकमान्य हॉस्पिटल चौकापासून डावीकडे वळून दळवीनगर मार्गे जाता येईल.
रिव्हर व्हू चौक चिंचवडकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद : या मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मागनि वाल्हेकरवाडी, रावेत मार्गे मुंबईकडे जातील तसेच भोसरीकडे जाणारी वाहने ही बिजलीनगर चौक-संभाजी चौक-भक्ती शक्ती चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
■ आलम गरेंजकडून पिंपरी चौकाकडे उलट्या दिशेने येणारे वाहतुकीस प्रवेश बंद.