spot_img
spot_img
spot_img

एसबीपीआयएम मध्ये ‘नवीन श्रम संहिता’ विषयावर कार्यशाळा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंद्र सरकारने नुकतेच जुने कामगार कायदे रद्द करून नवीन चार श्रम संहितांना मंजुरी दिली आहे. याची अंमलबजावणी करताना नियोक्ता कर्मचारी संबंध, संस्थात्मक अनुपालन आणि कार्य स्थळातील संस्कृती यावर मोठा परिणाम होणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर एचआर, व्यावसायिकांनी सखोल ज्ञान मिळवून ‘नवीन श्रम संहिता’ आत्मसात करावी असे मत ॲड. अद्वैत पटवर्धन यांनी व्यक्त केले.
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (एनआयपीएम) पुणे चैप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एसबीपीआयएम पुणे येथे ‘नवीन श्रम संहिता’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 
  यावेळी ॲड. श्रीकांत मालेगावकर, ॲड. पंकज मोहोलकर, ॲड. जयंत शालिग्राम, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एनआयपीएम चे पुणे चैप्टर अध्यक्ष डॉ. कल्याण पवार, सचिव डॉ. अजित ठाकूर, डॉ. सतीश पवार, वहिदा पठाण, एसबीपीआयएमच्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.
     या कार्यशाळेत पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर व उर्वरित महाराष्ट्र मधून १७५ पेक्षा जास्त एचआर व्यावसायिकांनी सहभाग घेतला. वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामगार परिस्थिती संहिता या चार श्रमसंहिता बाबत तज्ञांनी विचार व्यक्त केले.
  नवीन श्रमसंहिता आजच्या एचआर आणि शैक्षणिक क्षेत्राला उपयुक्त ठरेल, त्याचे कायदेशीर आणि व्यावहारिक महत्व समजून घेतले पाहिजे असे ॲड. श्रीकांत मालेगावकर यांनी सांगितले.
  
 पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उद्योग व शैक्षणिक सहयोग बळकट करण्याच्या दृष्टीने आपले विचार मांडले. उद्योगांच्या सहभागामुळे कार्यक्षमता असणारे, उद्योगसिद्ध विद्यार्थी तयार करण्यास मदत होते. पीसीईटीमध्ये बोर्ड ऑफ स्टडीज मधील सहभाग, इंटर्नशिप कार्यक्रम आणि नव्या उद्योग अपेक्षांसह प्लेसमेंट उपक्रमांची माहिती दिली. अशा उपक्रमांमुळे उद्योग, एचआर आणि शैक्षणिक क्षेत्रात गरजेनुसार सक्षम वातावरण निर्माण होण्यास मदत होते असा विश्वास डॉ. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.                       
      डॉ. कल्याण पवार म्हणाले की, भारत सरकारने जुन्या कामगार कायद्याच्या जागी नवीन चार कोड्स नुकतेच भारतभर लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणी देशातील सर्व उद्योग, व्यासायिकांनी करायची आहे.  
    स्वागत डॉ. किर्ती धारवाडकर आणि सूत्रसंचालन ॲड. प्रशांत क्षीरसागर यांनी तर आभार बाळासाहेब सोनवणे यांनी मानले.
 पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!