शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्र दसरा भव्यतम, महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दसरा विशेष, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र दसरा भव्यतम सोडतीमधून तिकीट क्रमांक DB-02 25597 रूपये ५०,००,०००/- चे बक्षिस अग्रवाल लॉटरी एजन्सी, धुळे यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास प्रथम क्रमांकाचे बक्षिस व १,००,०००/- ची २ बक्षिसे जाहीर झाली आहेत.
८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री या मासिक सोडतीमधून MS2510-A-46601 या चिराग एंटरप्रायजेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.२१ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.
२१ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी या मासिक सोडतीमधून TJ- 02/3920 या मातोश्री एन्टरप्रायजेस, खामगांव व TJ- 07/9968 न्यु जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.५ लाखाची प्रथम क्रमांकाची दोन बक्षिसे जाहीर झाली आहेत.
२२ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतीमधून GJ- 01/1585 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहिर झाले आहे. तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रू. ८ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ६ बक्षिसे जाहीर झाली आहेत.
याशिवाय ऑक्टोबर-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १७३८३ तिकीटांना रु. १,३९,०५,५५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५८०६९ तिकीटांना रू. १,९२,५२,१००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.








