spot_img
spot_img
spot_img

७ डिसेंबर रोजी ‘मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड २०२५’ पुरस्कार प्रदान सोहळा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या दैनिक मेट्रो सिटी वृत्तांत या वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानाचे समजले जाणारे ‘मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड २०२५’ पुरस्कार समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार सोहळा येत्या ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात संपन्न होत आहे. सदर पुरस्कार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून शिवसेना उपनते इरफान भाई सय्यद, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. उपमहापौर शैलजाताई मोरे, माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे, पिंपरी चिंचवड शहर शिवसेना संघटिका सरिताताई साने, पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे व सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, शिक्षण, आरोग्य, उद्योग, उद्योजकता, क्रीडा आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड ही एक महत्त्वाची व्यासपीठ बनली आहे. यंदाही या पुरस्कार सोहळ्याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असून अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने दरवर्षी मेट्रोसिटी आयकॉन अवॉर्ड देऊन शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. आपल्या कार्यातून समाजात ठसा उमटविणारे तसेच आपल्या मेहनतीने उंची गाठणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पिंपरी चिंचवड शहरात शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील कौतुकास्पद कामे करणाऱ्या व्यक्तींना कर्तुत्वाची थाप देण्याकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याही वर्षी सदर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सक्षम नेतृत्व असणारे निखिल उमाकांत दळवी, महिला सक्षमीकरणासाठी नेहमी आग्रही असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सीताताई राम केंद्रे, सामाजिक कार्याचा वसा जपणारे लक्ष्मण सर्जेराव शिंदे, सामाजिक कार्याचा ध्यास असणाऱ्या सीमा शांतादेवी जयसिंगराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विनोद सत्यशीला शंकरराव वरखडे, सर्वसामान्यांच्या हाकेला साथ देणारे रमजान सय्यद, विकासाचे व्हिजन व दूरदृष्टी असणारे नेते शिरीष संभाजीराव साठे, संघर्षातून घडलेला युवक अभिजीत तानाजी कदम, आदर्श कामगार किरण दिनकर बागल, थेरगाव चे सुपुत्र अनिकेत परशुराम प्रभू, यशस्वी उद्योजक संजय जगताप व जनसेवेचा वाढता आलेख असलेले व्यक्तिमत्व मारुती जाधव, पिंपरीतील सक्षम नेतृत्व सुरेश लोंढे, कायदेतज्ञ ऍड विशाल जाधव, समाजात महिला नेतृत्व म्हणून नावारूपास येत असलेल्या आस्मा इम्रान शेख, जैन समाजातून उदयोन्मुख व्यक्तिमत्व संदेश गादीया, प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अश्विनी नामदेव शिंदे, ए.के.ढवळे नेओबिल्ड कंपनीचे संचालक आबा ढवळे या व्यक्तींचा यंदाचा मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शहरातील प्रामाणिकपणे उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा देखील सन्मान यावेळी होणार आहे. तरी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या संपादिका शबनम सय्यद यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!