spot_img
spot_img
spot_img

ॲड. विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ रंगला पैठणी’चा कार्यक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे नेते ॲड. विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 2 जाधव वाडी, कुदळवाडी, चिखली, बोराडेवाडी, मोशी परिसरातील महिला भगिनींसाठी ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणी’चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 दरम्यान रामायण मैदान, श्री संत सावतामाळी मंदिराजवळ, जाधव वाडी येथे संपन्न होणार आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरातील युवकांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान सेंट्रल हॉल, रामायण मैदान येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती सौ. शुभांगी विशाल जाधव व ॲड. विशाल भाऊ जाधव युवा मंच वतीने देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रम महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे संयोजन अभिनेता ओम यादव प्रस्तुत होणार आहे. तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यात अनेक युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

येत्या 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात विजेत्या महिला भगिनींसाठी प्रथम क्रमांक स्कुटी व पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकावर फ्रिज, तृतीय क्रमांकावर टीव्ही, चतुर्थ क्रमांकावर वॉशिंग मशीन, पाचव्या क्रमांकावर आटा चक्की, सहाव्या क्रमांकावर टेबल फॅन व सातव्या क्रमांकावर मिक्सर बक्षीस म्हणून भेट देण्यात येणार आहे. तरी प्रभागातील महिला-भगिनींनी जास्तीत जास्त या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!