spot_img
spot_img
spot_img

बेकायदा मद्यनिर्मिती, विक्रीवरील कारवाईतून तीन हजार कोटी

शबनम न्यूज | पुणे

बेकायदा मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने कारवाई करून चालू आर्थिक वर्षात तब्बल तीन हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) दोन हजार ७२९ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा महसुलात ९.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पाच हजार ९९५ गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पाच हजार ८९१ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत ६२१ वाहने आणि २५ कोटी ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क विभागाने तीन हजार ९८८ गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत तीन हजार ६०४ आरोपींना अटक केली होती.

प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत सराईत गुन्हेगारांविरुद्ध ५७७ प्रस्ताव दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यांपैकी २९९ जणांकडून चांगल्या वर्तनाची बंधपत्रे (बाँड) घेण्यात आली. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) नऊ प्रस्तावांपैकी एका सराइताविरुद्ध कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६९ मद्यालयांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, चार मद्यालये कायमस्वरूपी बंद करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!