spot_img
spot_img
spot_img

‘स्पा’च्या नावाने वेश्याव्यवसाय; सात तरुणींची सुटका

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पिंपळे सौदागरमधील “The Aura Thai Spa” मध्ये स्पाच्या आड चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. कारवाईदरम्यान पोलिसांनी इतर राज्यांतील सात तरुणींची सुटका केली.

त्यात नागालँड (३), मिजोराम (१), त्रिपुरा (१), केरळ (१) आणि महाराष्ट्र (१) या राज्यांतील महिलांचा समावेश आहे.याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक अभिजित लोरन्स (वय ३०, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम, केरळ) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान आणि पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पिंपळे सौदागर येथील रोस आयकॉन बिल्डिंगमधील शॉप क्रमांक २०१ ते २०४ या मध्ये ‘ऑरा स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली.शहानिशा पूर्ण झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. यावेळी सात तरुणींची सुटका करण्यात आली. चौकशीत स्पा मालक अभिजित लोरन्स हा तरुणींना पैशांचे आमिष दाखवून या अवैध व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!