शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पदभार स्वीकारला. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदावर श्री. अग्रवाल यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले होते.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (अ.व.सु) राधिका रस्तोगी, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद-सिंगल, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्यासह मुख्य सचिव कार्यालय व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.








