spot_img
spot_img
spot_img

वाकडला भव्य गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘दीपोत्सव विशेष गडकिल्ले बांधणी स्पर्धे’चा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी (ता. २९) वाकड येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणाऱ्या बालगोपाळांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता.
      सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला तो ‘जय जय शंकर’ फेम बालकलाकार आरुष बेडेकर. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, उद्योजक सुमित बाबर, किरण वडगामा, प्रशांत विनोदे, संतोष कलाटे, अजय कलाटे, निखिल कलाटे, बाळकृष्ण कलाटे, अक्षय जमदाडे, गिरीश शेडगे, तेजस माझिरे, शिवाजी कटके, युवराज सायकर, दिनेश वाजे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रगीताने सुरुवात झाली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्वांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.
         आमच्या इतिहासातील गडकिल्ले हे केवळ दगड-मातीचे नाहीत, तर स्वराज्याची स्वप्ने आणि बलिदानाचे प्रतीक आहेत. ही स्पर्धा मुलांमध्ये इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण करेल आणि शिवचरित्राची गोडी निर्माण करेल, महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचे सामरिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक राहुल कलाटे यांनी सांगितले.
यावेळी सहभागी स्पर्धकांनी मनोगत केले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या स्तरावर घेण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

 स्पर्धेतील विजेते

सोसायटी ग्रुप :- प्रथम: पलाश सोसायटी, द्वितीय: बाबाजी पांडू भांडे कुस्ती संकुल, तृतीय:स्कायलाईन सोयायटी वाकड, उत्तेजनार्थ: रॉयल मॅजेस्टिक सोसायटी, शिवशंभू बाईज, केतन पॅराडाईज सोसायटी, वैयत्तिक : प्रथम : यश धेंडे, श्री रामबाडे, दुतिय: समर्थ दळवी, तृतीय: अर्णव गोते, उत्तेजनार्थ: सुषमा ढवळे, अनिरुद्ध शेंडकर, पायल पवार, आदित्य नखाते, सानवी सोरटे, शौर्या कुलकर्णी, श्लोक कोते

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!