spot_img
spot_img
spot_img

मावळातील दळणवळण होणार सुलभ; उद्योग, पर्यटनाला चालना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातील शहरी, ग्रामीण भागात विस्तारलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात रस्त्यांसह रेल्वेमार्गावर भुयारी पूल, उड्डाणपुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. मळवली आणि कान्हे रेल्वे स्थानक उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे टाकवे एमआयडीसी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ल्याकडे जाणे सोपे होणार आहे. यामुळे उद्योग, पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे व्यक्त केला. मळवली आणि कान्हे रेल्वे स्थानक क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडी सुटणार असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मळवली आणि कान्हे रेल्वे स्थानक क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यास रेल्वेने मान्यता दिली. या दोन्ही पुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी बारणे बोलत होते. यावेळी आरपीआय पक्षाचे नेते सूर्यकांत वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, भाजपा महिला जिल्हाअध्यक्ष सायली बोत्रे, भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, शिवसेना जिल्हा संघटक अंकुश देशमुख, शिवसेना उप जिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केदारी, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, आरपीआय पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शिवसेना महिला मावळ तालुका प्रमुख शुभांगी काळंगे, एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश धणिवले, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना मावळ उपतालुका प्रमुख अमित कुंभार, देहूगाव शहरप्रमुख सुनिल हगवणे, मळवली ग्रामपंचायत सरपंच गणेश तिकोने, दिलीप महाराज खंगणे, सागर हुलावळे, बाळासाहेब आंबेकर, मुन्ना मोरे, नवनाथ हरपुडे, मदन शेडगे, नितीन देशमुख बाळासाहेब भानूजगरे, सहादु बडेकर, खंडू शेलार व मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात २१ भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. त्यात मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव, शेलारवाडी, कार्ला, जांभूळ येथील भुयारी मार्गाचा समावेश आहे. लोणावळा, वडगाव केशवनगर येथील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच काम पूर्ण होईल. कान्हे रेल्वे स्थानक क्रॉसिंगवरील पुलामुळे नागरिकांची घरे जात होती. त्यामुळे पुलाचा मार्ग बदलला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा पूल आंदर मावळला जोडणारा मोठा दुवा ठरणार आहे. टाकवे, जांभळू एमआडीसी भागाला हा उड्डाणपुल जोडणार आहे. याचा एमआडीसीला मोठा फायदा होणार असून उद्योगाला चालना मिळेल.

मळवली उड्डाणपूल व्यावसायिकांची दुकाने, नागरिकांच्या घरांवरून जात होता. नागरिकांच्या सूचनेनुसार अपेक्षित बदल करण्यात आला आहे. हा उड्‌डाणपूल मळवली परिसरातील भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला, देवळे आणि कालाखुर्सी या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पुढे पाटणपर्यंत पूल जातो. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

रेल्वे स्थानकांचा कायापालट

अमृत भारत योजनेअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि पनवेल रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळत असल्याचेही बारणे यांनी सांगितले.

पुणे-लोणावळा रेल्वेची तिसरी-चौथी मार्गिका लवकरच

पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजित पाच हजार १०० कोटी रुपयांचा असून पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे यासाठी केंद्र, राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

मळवली आणि कान्हे उड्डाणपूल

मळवली उड्डाणपुलात एकूण ३२ फाउंडेशन्स असून त्यात ३ अबूटमेंट्स आणि २९ पिअर्स समाविष्ट आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ६४ मीटरचा १ मुख्य गर्डर (रेल्वे ट्रॅकवर) आणि १५ मीटर लांबीचे ३० गर्डर्स रस्त्यासाठी बसविण्यात येणार आहेत. उड्डाणपुलावर १२ मीटर (४० फूट) एकूण रस्त्याची रुंदी आहे. संपूर्ण उड्‌डाणपुलाची एकूण लांबी ६०० मीटर आहे. यासाठी अंदाजित ५३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कान्हे उड्डाणपुलात एकूण ५ फाउंडेशन्स असून त्यात २ अबूटमेंट्स आणि ३ पिअर्स समाविष्ट आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३६ मीटरचा १ मुख्य गर्डर. १८ मीटर लांबीचे २ गर्डर्स आणि १२ मीटरचा १ गर्डर रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या रस्त्यासाठी बसविण्यात येणार आहेत. उड्‌डाणपुलावर १२ मीटर (४० फूट) एकूण रस्त्याची रुंदी आहे. उड्डाणपुलाची एकूण लांबी ४७० मीटर आहे. त्यासाठी अंदाजित ४३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!