spot_img
spot_img
spot_img

थेरगाव मधील प्रामाणिक व सक्षम नेतृत्व नम्रताताई रवि भिलारे !

पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातून एक प्रामाणिक, सक्षम नेतृत्व म्हणून नम्रता रवि भिलारे यांचा नावलौकिक आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील प्रत्येक अडचणीत असलेल्या कुटुंबीयांना प्रामाणिकपणे मदत करणे हा नम्रता ताईंचा गुणधर्म, आणि या गुणधर्माच्या अनुषंगाने त्यांनी अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याचा वृत्त हाती घेत त्या सातत्याने प्रभागातील समस्या सोडविण्याचे काम करत आहेत .

रवि रामदास भिलारे हे थेरगाव परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. रवी भिलारे यांच्या मार्गदर्शनातच नम्रता ताई यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली.

एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या नम्रता ताई यांना त्यांच्या लग्नानंतरच सामाजिक आणि राजकीय वातावरण मिळाले. लग्नाच्या आधी माहेरी त्यांचे राजकीय किंवा सामाजिक असे वातावरण नव्हते. परंतु लग्नानंतर रवी भिलारे या त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्या पतीसोबत सामाजिक कार्याची आवड त्यांना निर्माण झाली आणि तेव्हापासूनच त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात करत अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

नम्रता ताई भिलारे यांच्या सामाजिक कार्याचा आलेख उंचावत राहिला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य यामध्ये अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप, औषधांचे वाटप, या काळात एखाद्या सामान्य कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण असताना नम्रता ताई भिलारे यांच्या वतीने अनेक कुटुंबांना अन्नदान करण्यात आले. या काळातच अनेक सामान्य कुटुंबातील व्यक्ती या नम्रता ताईंसोबत जोडला गेला आहे.अपंग महिलांचा व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान, रवी दादा भिलारे सोशल फाउंडेशन तर्फे गरजू, गरीब नागरिकांना अन्नधान्य वाटप, कोरोना काळात गरजवंतना नवीन कपडे व मिठाईचे वाटप करत दिवाळी साजरी, थेरगाव परिसरामध्ये औषध फवारणी, कोरोना काळात कोविड योद्धांचा सन्मान, पूरग्रस्तांना 500 किलो तांदूळ वितरण असे अनेक उपक्रम कोरोना काळात त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आले.

प्रभाग क्रमांक 23 च्या विकास कामाबाबत सांगाल तर त्यांनी या प्रभागात कोणतेही संविधानिक पद नसताना म्हणजेच नगरसेवक पद नसतानाही त्यांनी जनसेवक म्हणून आपले कार्य हे एखाद्या नगरसेवकापेक्षा किंचित भर जास्तच केले आहे.

प्रभागातील मूलभूत समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यावर त्यांनी नेहमी भर दिला आहे. यामध्ये प्रभागातील रस्ते, प्रभागातील ड्रेनेज लाईन, प्रभागात सतत येणारा पाणीटंचाईचा प्रश्न असो किंवा वीज खंडित होण्याचा प्रश्न त्यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून असे अनेक प्रभागातील विकासाची कामे मार्गी लावली आहे.

प्रभागातील महिलांना रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी अनेक महिला बचत गटांची स्थापना केली आहे. या महिला बचत गटांना महानगरपालिकेच्या अनेक योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिला आहे. महिलांचे संघटन हे नम्रता ताईंची ताकद आहे. त्यांनी अनेक महिलांचे या निमित्ताने संघटन केले आहे.

कोणतेही सणसमारंभ असो दिवाळी, दसरा, क्रिसमस, रमजान ईद कोणत्याही धार्मिक समाजाचे सण या निमित्ताने नम्रता ताई रवी भिलारे व सामाजिक कार्यकर्ते रवी रामदास भिलारे यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. सन समारंभाच्या निमित्ताने गरजू कुटुंबांना मदत व्हावी, यासाठी हे उपक्रम राबविताना अनेक वंचित घटकांना यात सामावून घेतले जाते.गणपती उत्सव , नवरात्र, दसरा, दिवाळी आपल्या देशाचा स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन हे सर्व सण समारंभ प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहात सामाजिक कार्यकर्ते रवि भिलारे व नम्रता ताई भिलारे यांच्या पुढाकाराने साजरे केले जातात.

प्रभागातील ड्रेनेज लाईन दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, लाईट, फवारणी, असे अनेक कामे भिलारे कुटुंबीयांच्या नावे आहेत.

रवि दादा भिलारे फाउंडेशन च्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ना नफा ना तोटा या तत्त्वावर गणरायाची मूर्ती नागरिकांना देण्यात येतात. हा उपक्रम अनेक वर्षापासून भिलारे कुटुंबीयांच्या वतीने राबविला जातो. तसेच प्रत्येक वर्षी गणेश विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात येतो. यामध्ये पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो.

पावसाळ्याच्या दिवसात आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक कुटुंबीयांचे अतोनात नुकसान होत असते, अशा पूरग्रस्त कुटुंबीयांना रवी दादा भिलारे यांच्या तर्फे शेकडो किलोचे अन्नधान्य देण्यात येतात.

महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तर दरवर्षी रामनवमीनिमित्त अनाथ आश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांना फळे वाटप, अन्नधान्य वाटप तसेच शालेय भेटवस्तू देण्यात येतात. थेरगाव मध्ये रवी दादा भिलारे यांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या दिमाखात उत्साहात संपन्न होत असते

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान, थेरगाव मधील पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा सन्मान, कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान व्हावा, याकरिता अनेक कोविड योद्धांना सन्मानित करण्यात भिलारे कुटुंबीय अग्रेसर आहेत.

स्मार्ट सिटी म्हणून आपला शहर ओळखला जातो. या स्मार्ट सिटी असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसर हा स्मार्ट प्रभाग व्हावा, यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगत असतात.

प्रभागात क्रीडांगण असावे , एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिका असावी. उद्याने सुशोभित असावी, प्रभाग हे प्रदूषण रहित असावे, प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सेवा मेळाव्या, प्रभागात शालेय साधनांची कमतरता विद्यार्थ्यांना भासू नये, सुसज्ज व सर्व सुविधा युक्त डिजिटल शाळा या प्रभागात असावी. रस्ते विस्तृत व वाहतुकीला सुरळीत असावे, मोठे मोठे फूटपात असावेत. वाहतुकीची समस्या नसावी. असे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन नम्रता ताई भिलारे या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता तयारी करत आहेत.

रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम असे अनेक उपक्रम नम्रता ताई भिलारे व रवी भिलारे यांच्या पुढाकाराने थेरगाव परिसरात राबविले जातात.

थेरगाव परिसरात नम्रता ताई भिलारे यांचा नावलौकिक , मिळणारी प्रसिद्धी आणि केलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर त्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत आहेत. प्रभागातील मतदारांच्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. थेरगाव परिसरातील मतदार हे नम्रता ताई भिलारे यांना महानगरपालिकेच्या सभागृहात प्रभागाचे नेतृत्व करण्याची नक्कीच संधी देतील, असे एकंदरीत या प्रभागातील चित्र आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!