शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, याकरिता कार्यकारिणी अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये सौ दिपाली संजय कलापुरे यांना परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.
दिपाली कलापुरे यांची नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे तसेच महिला मोर्चाचे अध्यक्ष सुजाताई पालांडे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप , विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे व माजी आमदार अश्विनीताई जगताप तसेच माजी खासदार अमर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सौ दिपाली कलापुरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच भारतीय जनता पक्षाने परत एकदा दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरविणार असल्याचे सांगितले.








