spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्रमांक 22 चा विकास करण्यासाठी विनोद तापकीर निवडणूक रिंगणात उतरणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढत आहे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असून या पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे अशातच प्रभाग क्रमांक 22 काळेवाडी या परिसरात भाजपचेच मागील पाच वर्षीय सत्ता काळात स्वीकृत सदस्य राहिलेले विनोद तापकीर यांना मतदारांचा प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. 2017 मध्ये त्यांनी महानगरपालिका निवडणूक लढवली परंतु फार कमी फरकाने त्यांचा विजय निसटला तरीही त्यांच्या कार्याची दखल घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी त्यांना स्वीकृत नगर सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली आणि विनोद तापकीर यांनी या संधीचे सोने केले. प्रभागातील अनेक समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडिण्यावर त्यांनी भर दिला त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव असल्याने गेल्या अनेक वर्षापासून प्रभागातील समस्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी सोडविले आहेत.

प्रेमळ व सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव, जनतेत सहज मिसळण्याची वृत्ती यामुळे त्यांनी काळेवाडीच्या सर्व नागरी समस्या सोडविण्यात सक्रियता दाखवली आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळत गेले. प्रभागातील वीज समस्या असो पाणीपुरवठ्याच्या समस्या किंवा वाहतूक समस्या, वीज समस्या या सर्व प्रश्नांवर उपाययोजना त्यांनी केल्या आहेत तसेच पुढील काळात मतदारांनी आपल्याला संधी दिली तर आपण आपला प्रभाग हा स्मार्ट प्रभाग कसा होईल यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रभागातील सर्व समस्यांवर आपण कायमचा तोडगा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा प्रभाग हा विकसनशील प्रभाग असेल आपल्या कडे अनेक विकासाचे मुद्दे आहे या विकासाच्या मुद्द्यांवरच आपण आगामी महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. असे त्यांनी म्हंटले आहे. मतदारांचा मिळणारा पाठिंबा पाहता त्यांना नक्कीच या मतदारसंघात मतदार प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील यात शंका नाही.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये उमेदवारी मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षात त्यांचे प्रयत्न सुरु आहेत ,त्यांना पक्षश्रेष्ठींच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद हि मिळाला आहे. आपण या निवडणुकीत मोठ्या जिद्दीने उतरणार आणि प्रभागाच्या विकासासाठी ही निवडणूक लढविणार आणि मतदारांच्या प्रचंड मताधिक्याने आपण विजयी होणार असा त्यांनी ठाम आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!