spot_img
spot_img
spot_img

महिला अत्याचाराविरोधात दुर्गा ब्रिगेडचे लाक्षणिक उपोषण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बालिका व महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात उपोषण आयोजित करण्यात आले. संस्थापक अध्यक्षा कु.दुर्गा भोर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि दुर्गा ब्रिगेडच्या कार्यकर्त्या सामाजिक राजकीय ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.

संविधान दिनी महिलांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही खेदाची गोष्ट आहे शासनाने शक्ती कायदा त्वरित अंमलबजावणी न केल्यास तसेच आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा न दिल्यास मंत्रालयावर महिलांचा विराट आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे दुर्गा भोर यांनी नमूद केले. राज्यातील महिला सुरक्षेची दयनीय परिस्थिती, वाढती गुन्हेगारी, फास्टट्रॅक कोर्टातील विलंबित निकाल शक्ती कायद्याची अंमलबजावणी नाही आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कायद्यांचा प्रत्यक्ष फायदा होत नसल्याची गंभीर टीका यावेळी करण्यात आली.

यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे दुर्गा भोर यांनी मुख्य मागण्या केल्या त्यात शक्ती कायद्याची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी –

1. मालेगाव प्रकरणातील आरोपीस फास्टट्रॅक कोर्टामार्फत त्वरित फाशी

2. राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना

3. फास्टट्रॅक कोर्टातील प्रकरणांचा 1–1.5 वर्षांचा विलंब तात्काळ कमी करावा

कायदा-सुव्यवस्था सुधारून महिला सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे आणि राज्यातील शहरातील बालिका शालेय विद्यार्थिनी महिला कामगार आणि गृहिणींना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे हे सांगितले
उपोषणाचा समारोप संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार आणि कॉन्स्टेबल कोमल गरड यांच्या हस्ते दुर्गा भोर यांचे उपोषण सोडण्यात आले

उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविणाऱ्या मान्यवरांमध्ये विविध पक्षाचे राजकीय आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते त्यात प्रामुख्याने
माजी नागसेविका सुलभाताई उबाळे वैशाली घोडेकर सुलक्षणा धर प्राजक्ता पांढरकर यशवंत भोसले, निलेश मुटके, दत्ता भांडेकर ,अझीज शेख ,बाळासाहेब भागवत, दिलीप पांढरकर,अभय भोर दीनानाथ जोशी शरद टेमगिरे धम्मराज साळवे राजाभाऊ सरोदे, प्रल्हाद कांबळे, रामभाऊ दरवडे, शरद टेमगिरे, वैभव जगताप , सदाशिवराव पाटील गणेश भांडवलकर,, वेजनाथ शिरसाट, अॅड. सचिन पवार शुभम यादव बी आर माडगूळकर यांचा समावेश होता.

दुर्गा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांपैकी रहिसा पठाण, रेश्मा मुल्ला, नाझिया शेख, सविता शेंडगे, लक्ष्मीनाथ टिळक, संगीता विद्यागज, सुजाता काळे, मोहसीना शेख, सलोनी पहाडवाले, आशा कोळपे, कविता कंकाळ वैशाली बोत्रे आणि नीता पांचाळ यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

उपोषणाच्या माध्यमातून दुर्गा ब्रिगेडने राज्य सरकारला कठोर इशारा दिला की, महिला अत्याचारांच्या घटना न थांबल्यास संघटना रस्त्यावर आणखी तीव्र आंदोलन उभे करेल. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर यांनी सूत्रसंचालन केले .

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!