शबनम न्यूज | थेरगाव
क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड मनपाने आनंदवन ,वनदेव क्रीडांगणामध्ये विकसीत केलेल्या कबड्डी मैदान व कबड्डी मॅटचे उद्घाटन दिनांक १०/४/२०२५रोजी श्रीरंग उर्फ आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा यांचे शुभ हस्ते पार पडले.
यावेळी झामाताई बारणे मा. उपमहापौर पिं.चिं.म .न .पा., मायाताई बारणे मा. नगर सदस्या, सिद्धेश्वर बारणे मा.नगर सदस्य, युती सेना शहर प्रमुख रितू कांबळे, सौ सताळीकर राजश्री अभियंता क्रीडा स्थापत्य , श्री पवन दांदले कनिष्ठअभियंता विद्युत, खराडे प्रमोद पर्यवेक्षक विद्युत , लोंढे प्रविण आरोग्य सहाय्यक , अशोक शिंदे क्रीडाशिक्षक, विट्ठल पारखे, महानगरपालिकेतील शाळेच्या माजी राष्ट्रीय खेळाडू संतोषी चौधरी क्रीडा शिक्षिका ,आकांक्षा दुधाळ महाराष्ट्र पोलिस,पूजा जगताप महाराष्ट्र पोलिस यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
सदर मैदान विकसित करणे कामी महानगरपालिकेचे क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील , किशोर ननवरे प्रभाग अधिकारी ग, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, विजय जाधव कार्यकारी अभियंता क्रीडा स्थापत्य,श्री निखिल फेंडर उपअभियंता क्रीडा, बाळासाहेब लांडे कार्यकारी अभियंता विद्युत , शंतनू कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले व सदर कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा पर्यवेक्षक बन्सी आटवे व हरिभाऊ गायकवाड यांनी केले.
सदर उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय थेरगाव व क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका कबड्डी संघाच्या राष्ट्रीय व राज्य खेळाडूंनी प्रेक्षणीय खेळ करत प्रदर्शनीय सामना सादर केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.