शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या दरम्यान होणाऱ्या महा मेट्रो स्टेशनवर टू व्हीलर पार्किंग सुविधा असावी, अशी मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
सध्या मेट्रो स्टेशन मध्ये टू व्हीलर पार्किंग सुविधा नसल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच नो पार्किंग असल्यामुळे अनेक ठिकाणी टू व्हीलर गाड्यांना दंड भरावा लागतो, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागते, तरी निगडी ते पिंपरी दरम्यान होणाऱ्या नवीन महा मेट्रो स्टेशन येथे टू व्हीलर पार्किंग सुविधा द्यावी, अशी मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.