spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

पिंपरी, २५ नोव्हेंबर २०२५:- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह,शहरातील विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

तर वल्लभनगर येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुलक्षणा धर, महा मेट्रो प्रशासनाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड,संपत पाचुंदकर,वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत धर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार, डॉ. उज्वला अंदूरकर, शैलजा भावसार, मेट्रन वत्सला वाजे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांच्यासह अन्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!