शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रभाग निहाय अंतिम ड्राफ्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. या यादीमध्ये असंख्य चुका असून ३ लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी असल्याची कबुली खुद्द महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मतदारांना गैरसोयीचे दूरच्या भागातील मतदारांची नोंदणी अनेक प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची शंका विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.
त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे या ड्राफ्ट यादीवर हरकती नोंदवण्यासाठी केवळ ८ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. एक प्रकारे सदोष मतदार यादी पुढे रेटून निवडणुका घेण्याचा हा डाव असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.
हीच भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, समाजवादि पार्टी यांच्यासह इतरही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त शिष्ट मंडळाच्या माध्यमातून मनपा अतिरिक्त आयुक्त मंगेश दिवटे यांची भेट घेतली. मतदार यादी मध्ये मोठा घोळ असल्याची बाब स्वतः आयुक्तांनी मान्य केली आहे. या माध्यमातून सदोष पद्धतीने निवडणुका घेऊ नये, आधी मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष कराव्यात व त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बाप्पुसाहेब पठारे, अरविंद शिंदे, साईनाथ बाबर, संजय मोरे, गजानन थरकुडे, वंचीत चे अरविंद तायडे, बाळासाहेब शिवरकर, बाबु वागसकर, आश्विनीताईं कदम, अंकुशआण्णा काकडे, जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर,. अभय छाजेड, मनोहर जांबूवंत, सचिन दोडके आदी उपस्थित होते.








