spot_img
spot_img
spot_img

वारंवार होणाऱ्या गर्भपातावर प्रभावी आयुर्वेद उपचाराचे आंतरराष्ट्रीय परिषदेत केस प्रेझेंटेशन

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. सारिका लोंढे यांची आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रभावी केस प्रेझेंटेशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलच्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सारिका लोंढे यांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय परिषदेत Recurrent Pregnancy Loss (RPL) — म्हणजे सलग गर्भपात होणाऱ्या गुंतागुंतीच्या आजारावर आधारित संशोधनात्मक केस प्रेझेंटेशन सादर करून आयुर्वेदाची उपचारक्षम क्षमता जागतिक पातळीवर अधोरेखित केली.

या प्रकरणात 35 वर्षीय महिलेला सलग सहा गर्भपात झाले होते. सततच्या अपयशातून निर्माण झालेला मानसिक, शारीरिक ताण आणि पुनःपुन्हा अपयशाची भीती — अशा परिस्थितीत आयुर्वेदाने दिलेले आश्वासक यश हे खरोखर उल्लेखनीय ठरले.

डॉ. लोंढे यांनी दिलेल्या संरचित आयुर्वेद उपचारांमध्ये विरेचन, उत्तरबस्ती, रसायन उपचार, तसेच सत्त्वावजय चिकित्सा यांचा समावेश होता. या माध्यमातून रुग्णातील वात–पित्त असंतुलन, त्रिदोष दुष्टी आणि बीज/प्रजनन धातूची झालेली क्षीणता यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले.

 उल्लेखनीय परिणाम :
नियमित व शास्त्रोक्त आयुर्वेद उपचारांनंतर रुग्ण नैसर्गिकरित्या गर्भवती झाली आणि तिने Monochorionic–Monoamniotic अशा उच्च-धोक्याच्या ट्विन प्रेग्नन्सीला संपूर्ण कालावधीपर्यंत सुरक्षितपणे सांभाळले. दोन्ही बाळांचा सुरक्षित व यशस्वी जन्म झाला असून ते पूर्णतः स्वस्थ आहेत.

ही यशोगाथा आयुर्वेदाच्या सामर्थ्याची ठोस साक्ष देणारी आहे.

डॉ. सारिका लोंढे यांच्या मते, “हे यश केवळ एका रुग्णाचे नाही, तर आयुर्वेदाच्या शास्त्रीय दृष्टिकोनाचे जागतिक स्तरावर केलेले प्रभावी प्रदर्शन आहे.

आयुर्वेद अभ्यासत असलेल्या तरुण डॉक्टर्सनी जिज्ञासा, समर्पण आणि सातत्य ठेवून प्रत्येक रुग्णाचा सर्वांगीण विचार केला तर आयुर्वेद अगदी कठीण आजारांमध्येही अद्भुत परिणाम देऊ शकतो.”

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे यशस्वी उपचार प्रोटोकॉल व संशोधनात्मक कामगिरी पुढेही सातत्याने सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!