शबनम न्यूज | प्रतिनिधी
जेष्ठ, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. परंतु आज (२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मावळली.
विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब आणि धर्मेंद्र यांचे चाहते उपस्थित आहेत. परंतु धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धर्मेंद्र पश्चात त्यांची पत्नी हेमा मालिनी. याशिवाय सनी देओल, बॉबी देओल, ईशा, अहाना, विजेता, अजीता ही सहा मुलं आहेत. धर्मेंद्र हे देओल कुटुंबाचे भक्कम आधारस्तंभ होते. त्यामुळे देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या निधनाने शोकाकूल झालं आहे.








