spot_img
spot_img
spot_img

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन चा उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी
एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन मधील “मुलधारा हेरिटेज क्लब” च्या सर्व विद्यार्थी सभासदांनी चिंचवड गाव आणि परिसरात हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड शहराचा धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा असणारे मोरया गोसावी मंदिर, राम मंदिर, मंगलमुर्ती वाडा, क्रांतिवीर चापेकर वाडा येथे भेट देऊन त्याचे सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय महत्व समजून घेतले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन मधील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणे, त्यांची माहिती घेणे, वास्तुशिल्पीय महत्त्व समजून घेणे असे उपक्रम “मुलधारा हेरिटेज क्लब” च्या माध्यमातून राबविले जातात. यामुळे परिसराच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाची,  आणि तत्कालीन काळातील वास्तुरचनेची माहिती मिळते. या वारसा अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी स्केचिंग सत्र राबविले. यामुळे स्थळांचे निरीक्षण करणे, नोंद वही ठेवणे आणि पर्यावरण पूरक संवेदनशीलतेने वास्तु उभारणे असे अनुभव विद्यार्थ्यांना मिळाले.
   महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या अध्यक्ष जान्हवी भोसले, उपाध्यक्ष दिशा प्रधान, सचिव श्वेता शिंदे, खजिनदार मानव कोतफोडे, सदस्य सुकन्या गवडे, प्राची देशपांडे आणि समृद्धा कदम व मार्गदर्शक आर्किटेक्ट अभिषेक रांका यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मुलधारा हेरिटेज क्लबचे कौतुक केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!