शबनम न्यूज | प्रतिनिधी
नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून चुलत भावावर चाकूने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. भावाचा मृतदेह कात्रज घाटातील एका डोंगरात टाकला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली.
याप्रकरणी अशोक पंडीत (वय ३५, रा. मोशी, मूळ रा. झारखंड) याला अटक करण्यात आली आहे. अजय पंडित (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंडीत आणि अशोक पंडीत हे चुलत भाऊ आहे. दोघे मूळचे झारखंडचे आहेत.
गेल्या चार वर्षांपासून ते पुण्यात मजुरी करतात. अजय हा कात्रजमधील खोपडेनगर भागात एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहत होता. त्याचा चुलतभाऊ अशोक हा मोशी येथे राहायला आहे. अजय हा बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आली होती.पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चुलतभाऊ अजयचा खून केल्याची कबुली दिली. अजयचा खून केल्यानंतर मृतदेह कात्रजमधील गुजरवाडी भागात टाकला. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेह ताब्यात घेण्यात आल्यानंतर ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिषठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी ही कामागिरी केली








