spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक स्तरावर चमकणार

  • अन्वर अन्सारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याकरिता निवड
  • दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया ने दिली संधी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील अनवर मुक्तार अन्सारी यांची येत्या १३ , १४, व १५ डिसेंबर रोजी संपन्न होत असलेल्या भारत विरुद्ध नेपाळ टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्या करिता निवड करण्यात आली आहे.

अन्वर अन्सारी यांनी यापूर्वी अनेक क्रिकेट टूर्नामेंट, क्रिकेट स्पर्धा मध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व खेळाची दखल घेत त्यांची या क्रिकेट सामन्यांकरिता निवड करण्यात आली आहे.

क्रीडा विश्वात क्रिकेट खेळामध्ये ऑलराऊंडर खेळाडू म्हणून अन्वर अन्सारी यांनी नवलौकिक मिळविले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आपण मिळालेल्या संधीचे सोने करणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या निवडीनंतर दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांनी अन्सारी यांची निवड केली आहे. तसेच निवड पत्रात अन्वर अन्सारी हे क्रिकेट क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करतील अशी आशा या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अन्वर मुक्तार अन्सारी यांच्या या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहराला अभिमान वाटावा अशी ही घटना म्हणावी लागेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कमी खेळाडूंना संधी मिळत असते आणि या मिळालेल्या संधीमुळे पिंपरी चिंचवड शहराचे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नक्कीच अनवर अंसारी यांच्या खेळामुळे नवलौकिक वाढणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

रांची, झारखंड येथे दिनांक १३ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आपण आपल्या देशाचे तसेच आपल्या राज्य व शहराचे नाव नक्कीच उत्तम खेळ खेळून जागतिक स्तरावर नेणार असल्याची ग्वाही निवडीनंतर अन्वर मुक्तार अन्सारी यांनी दिली आहे. तसेच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी हा आपला आनंद आपल्या कुटुंबांसमवेत साजरा केला व आपण आपल्या खेळाच्या माध्यमातून या मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करणार असल्याचे सांगितले आहे. आपल्या या निवडीचे श्रेय त्यांनी आपले कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच क्रिकेट प्रशिक्षक व आपल्या दिव्यांग क्रिकेट टीम मधील सर्व सहकाऱ्यांना दिले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!