शबनम न्यूज | प्रतिनिधी
सांगवी,पिंपळेगुरव मधील वेगवेगळ्या उपनगरात व गल्लीबोळात कुत्र्यांचीव मोकाट जनावरांची,दहशत निर्माण झाली आहे,नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन नागरिक धास्तावलेले दिसत आहेत,रस्त्यावर चारच्या किंवा 10 गटागटाने मोकाट कुत्रे, जनावरे बीनधास्तपणे रुबाबात फिरतांना दिसत आहेत. विशेषतः मुलामध्ये व जेष्ट नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येतात.

आण्णा जोगदंड म्हणाले की, गाय ,म्हैस,बैल यांचा कोंढवाडा जवळपास शहरातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे,मनपाने चिखली येथील सर्वे नंबर 1655 मध्ये पाच एकराचा गुरांचा गोठा विकासित आराखडयात प्रास्तावित केला आहे जागा ताब्यात असतानाही गोठा कागदावर राहिल्याची खंत जोगदंड यांनी व्यक्त केली.
नुकताच शाळा,रुग्णालय, क्रीडा संकुल,उद्याने, बस स्थानके, रेल्वे स्थान येथे भटकी जनावरे, कुत्रे व प्राण्यांना निवाराग्रहात पाठवावेत असा आदेश मा. न्यायालयाने नुकताच दिला आहे परंतु यावर कोणत्या प्रकारची कारवाई होताना दिसत नाही नियोजन शून्य कारभाराला पशुवैद्यकीय विभागच जबाबदार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले .फक्त टोलवा टोलवीची, उडवा उडवीची उत्तरे नागरिकांना दिली जातात.
महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने अशा मोकाट कुत्र्यांचा व जनावराचा शोध घेऊन वेळीच पायबंद घालावा. व लहान मुलांची व जेष्ट नागरीकांची या कुत्र्याच्या दहशती पासुन सुटका करावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण दगडे यांच्याकडे भेटून निवेदन देऊन केली आहे.
निवेदनावर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, सचिव, गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, शहराध्यक्षा मीनाताई करंजवणे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








