घर सांभाळणाऱ्या गृहिणींसाठी मौल्यवान बक्षीस देणारा आगळावेगळा कार्यक्रम
माजी नगर सेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या पुढाकाराने , स्त्रीरत्न फाउंडेशन व आदर्श शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी विधान सभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक पाच मधील महिला भगिनी करिता “खेळ रंगला पैठणीचा”’ हा भव्य दिव्या असा कार्यक्रम प्रचंड उत्साहात दिमाखात दिनांक १८ नोव्हेंबर रोजी आदर्श शिक्षण संस्थे च्या मैदानात संपन्न झाला.
प्रभाग क्रमांक पाच मधील रामनगर, तुकाराम नगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंत नगर, महादेव नगर, गवळी नगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत व परिसरातील असंख्य माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला अप्रतिम प्रतिसाद दिला.

घर सांभाळणाऱ्या, समाज घडविणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक क्षणात प्रेमाची उब देणाऱ्या सर्व गृहिणींसाठी हा आगळावेगळा कार्यक्रम खास मनोरंजन , विविध खेळ, स्पर्धा व मौल्यवान बक्षीसे देणारा ठरला, विविध मनोरंजक खेळांमधून महिलांनी आपली कौशल्ये, कल्पकता आणि उत्साह सुंदरपणे सादर केल्या. हास्य, मैत्री, उत्साह आणि स्पर्धेची मजा अनुभवत त्यांनी आनंदाचा मनमोहक उत्सव रंगवला.
खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे चे सादरकर्ते अक्षय मोरे यांनी आपल्या सादरीकरणाने या कार्यक्रमात वेगळाच रंग भरला, महिलांमध्ये जितके मनोरंजन करत हास्य फुलविले, तितकेच आपल्या संभाषण कौशल्याने कौटुंबिक नाती कशी टिकवावी याचे सुंदर उदाहरण देत भावुक पण केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रियांका ताई प्रवीण बारसे यांनाही गाणे गाण्याचा मोह आवरताआला नाही, त्यांनी स्वतः “बेकरार करके हमे युं ना जाईये” हे हिंदी चित्रपटातील गीत सुंदर प्रकारे सादर करून अनेकांना आश्चर्याच्या धक्का दिला.
अत्यंत आनंदाच्या तसेच उत्साह पूर्ण वातावरणात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांनी विविध बक्षिसे मिळविली ,सहभागी सर्व महिलांना पैठणी देण्यात आली तर उपस्थित सर्व प्रत्येकी महिलांना सरप्राईज गिफ्ट देण्यात आले.
या कार्यक्रमात स्पर्धेत विजेत्या महिलांना राष्ट्रवादी पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांच्या सह प्रविण बारसे,अनुराधा दौंड, कल्पना घाडगे ,जयमाला कदम ,गोपाळे मावशी ,सुषमा कुंभार, तृप्ती तापकीर, वैशाली पडवळ,वंदना लढे, तुषार शेवाळे आदी मान्यवरांच्या हस्ते हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली .
या कार्यक्रमात लॉटरी पद्धतीने ही महिला भगिनी विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. सदर बक्षीसे आदर्श शिक्षण संस्थेच्या महिला, शिक्षिका, कर्मचारी व पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
विविध खेळ व स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना मौल्यवान व आकर्षक बक्षीस देण्यात आली. यामध्ये पुडे अनुक्रमे क्रमांकाचे बक्षीस वितरित करण्यात आले. १) वैशाली साळुंखे -फ्रीज व पैठणी, २) ज्ञानेश्वरी कडु -पिठाची गिरणी व पैठणी, ३) राधा माळी – टीव्ही व पैठणी, ४)सानिका पलांडे – कुलर व पैठणी, ५) भाग्यश्री घोडेस्वार – अक्वागार्ड व पैठणी ६)आरती आगलावे – गॅस शेगडी,७)निर्मला नाणेकर -गॅस शेगडी अशी मुख्य बक्षिसे देण्यात आली.
तसेच लकी ड्रॉ प्रमाणे 10 बक्षिसे काढून त्यात सविता कोळेकर ,वर्षा पिंगुलकर, रेणुका मापारी ,मंगला नीरेराव ,मनीषा बनगुडे ,पूजा राठोड, प्रणिती पोटे ,दीपा चव्हाण ,राणी जावळे, ज्योती गिरी यांना इस्त्री व मिक्सर देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपोत्सव रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पाच क्रमांकाच्या महिला वर्षा लावंड, माधुरी कोकाटे ,ज्ञानेश्वरी कडू ,रेश्मा बनसोडे,रागिनी जाधव यांना प्रत्येकी ५ लीटरचा कुकर बक्षिस देण्यात आले. त्याच प्रमाणे उत्कृष्ट डान्स करून मनसोक्त आनंद घेणाऱ्या 25 महिलांना साडी गिफ्ट केली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून दीड लिटरची किटली भेट दिली. या कार्यक्रमात अनेक महिलांनी डान्स करून मनसोक्त आनंद घेतला या पैकी घेणाऱ्या उत्कृष्ट डान्स करणाऱ्या 25 महिलांना साडी भेट देण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असंख्य महिलांना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात पाठिंबा देण्याचे आवाहन केले त्यांच्या या आवाहनाला असंख्य महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकच आवाजात प्रियांका ताई बारसे यांना पाठिंबा दर्शविला.
अत्यंत खेळीमेळीच्या मनोरंजनाच्या वातावरणात तसेच आनंदाच्या भरात, मोठ्या उत्साहात, सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रियांका ताई प्रवीण बारसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.








