spot_img
spot_img
spot_img

अतिवृष्टी भागात मदत कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी
सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना अतिवृष्टीचा प्रंचड फटका बसला. यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या संकटातून इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यभरातील अनेक संस्था, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मदत कार्य राबवले होते. सामाजिक कामे करतांना गरजेतून आणि संवेदनशीलवृत्तीने केले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या योगदानानिमित्त ‘संकटातून संकल्पाकडे’ या सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. जोत्स्ना एकबोटे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर जमीन खरवडून गेली. त्याशिवाय या भागातील विद्यार्थ्यांचे ही मोठे नुकसान झाले होते. या संकटातून आपतग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात होत्या. पण तरीही या संकटातून इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना या आपत्तीची दाहकता कळावी, यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. कारण कोणतेही सामाजिक कार्य हे गरजेतून आणि अतिशय संवेदनशील वृत्तीने केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत २० महाविद्यालयांनी अतिशय मोलाची मदत केली. ती उल्लेखनीय व इतर महाविद्यालयाकरिता प्रेरणादायी आहे. अशाप्रकारचे राष्ट्रीय सेवा योजनेने सतत करीत राहावे, यामाध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आपण साध्य होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ मधे भारताचे ‘ विकसित भारत’ बनण्याचे स्वप्न आपण साकार करण्याकरिता प्रयत्नशील राहूया, असे आवाहन पाटील यांनी केले.
डॉ. एकबोटे म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये गेल्या काही दिवसात नविन कल्पना राबविल्या आहेत. उच्च शिक्षणामधे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षक भरतीचे प्रयत्न व संशोधन निधी तरतूद झाल्यास निधीची त्रुटी भरून काढता येईल का याबाबत विचार करण्याची गरज आहे, असेही डॉ. म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!