spot_img
spot_img
spot_img

“लोहपुरुषांच्या जयंतीनिमित्त एकात्मतेचा शक्तिपूंज- युनिटी मार्च भव्यतेने संपन्न”

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“एक भारत,आत्मनिर्भर भारत” या राष्ट्रीय संकल्पनेला अधोरेखित करत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित “युनिटी मार्च” क्रांतीवीर चाफेकर चौक, चिंचवड येथून अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या उत्साहात पार पडला.

या जिल्हास्तरीय पदयात्रेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी,युवक-युवती, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य,सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या मार्च दरम्यान राष्ट्रीय ध्वज फडकवत, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “एकता ज़िंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशाच्या अखंडतेचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करत तरुणाईने देशभक्तीचा संदेश दिला.

युनिटी मार्च म्हणजे फक्त एक पदयात्रा नाही, ती राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि भारताच्या भविष्यातील सामर्थ्याची प्रखर जाणीव आहे.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर काळात देशातील तुटलेल्या रियासतांना एकत्र आणून ‘अखंड भारत’ घडवला. त्यांची राष्ट्रदृष्टी, त्यांचे नेतृत्व आणि त्यांची कठोर राष्ट्रनिष्ठा आजच्या तरुणांनी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.आज आपण घेतलेली ही पदयात्रा जात, धर्म,भाषा,प्रदेश या पलीकडे जाऊन एक भारत घडवण्याचा संकल्प आहे.विद्यार्थ्यांचा, युवकांचा आणि नागरिकांचा आज दिसलेला उत्स्फूर्त सहभाग म्हणजे ‘नवभारताच्या एकतेची नवी शक्ती’ आहे. हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे आजचे कर्तव्य आहे.”

युनिटी मार्चचे प्रमुख मार्गदर्शक चिंचवडचे आमदार शंकर जगताप, मा.आमदार अश्विनी जगताप, तसेच माझा देखील सहभाग होता . संगठन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, महामंत्री/सरचिटणीस तसेच पदयात्रा संयोजक  मधुकर बच्चे, वैशालीताई खाडेय तसेच शहर पदाधिकारी,माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष,प्रकोष्ठ अध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय पद यात्रेत पुनरुत्थान समरसता गुरुकुल, डॉक्टर अरविंद बी तेलंग, प्रा रामकृष्ण मोरे,डॉक्टर डी.वाय. पाटील सर्व शाखा,रयत शिक्षण संस्था महात्मा फुले, जय हिंद पिंपरी चिंचवड एज्युकेशन,कमला एज्युकेशन,मॉडर्न कॉलेज, औद्योगिक तंत्र संस्था,सुभद्रा एज्युकेशन,आदी कॉलेज यांचा सहभाग होता.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!