शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील युवा नेते विनोद पवार यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विनोद पवार हे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते म्हणून थेरगाव परिसरात सर्वांच्याच परिचयाचे आहेत. माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्यासह अनेक सामाजिक उपक्रमात विनोद पवार यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या श्री शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळ या मंडळाच्या अंतर्गत विनोद पवार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. माजी नगरसेविका मनिषा ताई प्रमोद पवार या त्यांच्या वहिनी आहेत. घरात सामाजिक आणि राजकीय वातावरण असल्याने विनोद पवार यांनीही आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि सुरुवातीपासूनच त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राथमिकता दिली.

आपल्या आयुष्यातील सर्वात भयंकर काळ म्हणजे कोरोना काळ या कोरोना काळात विनोद पवार यांनी उत्तम प्रकारे सामाजिक काम करत अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तू तसेच आरोग्यदायी वस्तूंचे वाटप करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , गुणवंत विद्यर्थी सन्मान असे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जातात , सध्या ते आपल्या श्री शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळ च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात थेरगाव परिसरात संपन्न झाला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली व विनोद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली त्यामध्ये भाजप पक्षाचे काळूराम बारणे,माजी नगर सेवक अभिषेक बारणे, मनीषाताई पवार, तानाजी बारणे, संदीप गाडे, रवी दादा भिलारे, सनी बारणे, सागर बारणे, स्वप्नील बारणे, विनोद बारणे, नम्रताताई भिलारे, शाकीर भाई शेख, सीमाताई चव्हाण, रितू कांबळे, रत्नमाला ताई, देवमाने मंजू ताई गुप्ता ,वैशालीताई जाधव, किरण भाऊ शिंदे ,दिगंबर भाऊ पवार, प्रकाश देवगाव, नवीन भाई तुंगेकर, दीपक पाटील अनिल भाऊ गायकवाड आसिफ भाई कुरेशी, राहुल भाऊ आखाडे आदी मान्यवरांसहित परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते








