spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी विजय लोखंडे यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मा.सभापती विजय लोखंडे यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी मा. अजितदादा पवार साहेब व मा. सुनील तटकरे साहेब यांनी लोखंडे यांना राष्ट्रवादीकडून जबाबदारीचे स्थान देण्यात येत आहे, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली तसेच लोखंडे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!