spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडीत सोमवारी (दि.१७) दुपारी डम्परच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने हिंजवडीतील युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. डंपरचालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तन्वी वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच- १४, केव्ही- ३८८३) जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीच्या दिशेला जात होती. यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरच्या धडकेत (एमएच- १४, एचयू- ९८५५) चाकाखाली येऊन तन्वी हिचा मृत्यू झाला. अपघातात तिचे वडील जखमी झाले आहेत. तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

प्रामुख्याने अवजड वाहनांमधून रस्त्यावर पडणारी खडी, वाळू आणि डबरमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. त्यात, आयटी परिसरातील काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली भयानक दुरवस्था आणि सुसाट धावणारी अवजड वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!