शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरक्षणात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 30 ‘क’ ही जागा ओबीसी खुल्या वर्गासाठी होती. मात्र ही जागा ओबीसी महिलेसाठी थेट देणं गरजेचं होतं. निवडणूक आयोगाने सहा तीन ‘ब’ चा नियम दाखवत हा बदल केलाय. मात्र या एका जागेचं आरक्षण चुकल्यानं, प्रभाग 30 आणि प्रभाग 9 मधील चार जागांचे आरक्षण बदलले आहे. त्यामुळं चार जागांच्या इच्छुकांमध्ये नाराजी उफाळली असून सूचना आणि हरकती साठी त्यांना आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.
आयोगाने केलेल्या दुरुस्तीनंतर प्रभाग क्र.३० मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. तर, याच प्रभागातील जागा ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ती जागा सर्वसाधारण झाली आहे. तर, ओबीसी जागेवर एक जागा महिला आरक्षित झाली. त्यामुळे सोडतीत चिठ्ठी काढून सर्वात शेवटी प्रभाग क्र. १९ मधील ब जागा आबीसी महिलांसाठी राखीव झाली होती. त्या जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. तर प्रभाग ३० मधील ड जागेवरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून प्रभाग क्र.१९ मधील क जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.
ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्हीकरीता राखीव असतील, परंतु, त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरीता राखीव नसतील, तर अशा प्रभागांतील ओबीसी प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल, अशी नियमातील तरतूद आहे. ही तरतूद प्रभाग क्र.३० मध्ये वापरली न गेल्याने झालेली चूक आयागाने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने सोडतीत झालेली चूक दुरुस्त केली आहे. नियमानुसार योग्य पध्दतीने निश्चित झालेले आरक्षण प्रसिध्द करण्यात आले आहे.याबाबत नागरिकांना १७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निवडणूक विभागाकडे हरकत नोंदविता येणार आहे, असे पिंपरी चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी सांगितलं.
बदलानंतर दोन प्रभागातील आरक्षणाचे चित्र…
प्रभाग क्रमांक -१९ उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प
अ – अनुसूचित जाती – महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क – सर्वसाधारण (महिला)
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ३० दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ – अनुसूचित जाती
ब -अनुसूचित जमाती – महिला
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला
ड – सर्वसाधारण








