समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात आपलं अनमोल योगदान देणारे थोर समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त, पुण्याच्या गंज पेठ येथील त्यांचं निवासस्थान महात्मा फुले वाड्याला महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली; महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले .तसेच यावेळी अजित पवार यांनी महात्मा फुलेंशी संबधित छायाचित्रे आणि वस्तूंचा संग्रह असलेल्या संग्रहालयाची पाहणी केली. या वेळी पुणेचे राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या सह अनेक पदाधिकारी , अधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.