सलग दोन दिवस चाललेल्या या बाल जत्रेचा हजारो बालगोपाळांनी घेतला आनंद
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी:
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकाराने बाल दिनानिमित्त बाल जत्रा व मनोरंजन नगरीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी , चिंतामणी चौकातील पीएमआरडीए मैदानावर सदर बाल जत्रा व मनोरंजन नगरीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या बाल जत्रेचा हजारोच्या संख्येने बालगोपाळांनी आनंद लुटला, या जत्रेत मोठी आणि रंगीबेरंगी खेळणी ,मिकी माऊस, छोटे आकाश पाळणे, कटपुतली, खेळ, इत्यादी व यासारखे अनेक खेळ लहान बालकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

या खेळासोबतच लहान बालकांसाठी चविष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. या खाद्यपदार्थांचा बालकांनी मनसोक्तपणे आस्वाद घेतला दोन दिवस चाललेल्या या बाल जत्रेत लहान मुलांच्या सुरक्षेची ही काळजी घेण्यात आली. तसेच मुलांसाठी विशेष मनोरंजक खेळ आयोजित करून विजेत्या सर्वांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यामुळे या बाल जत्रेत सहभागी झालेल्या या लहान मुलांचा उत्साह द्विगुणीत झाला. सदर बालजत्रा व मनोरंजन नगरी मध्ये लहान बालकांचा उत्साह दिसून येत होता.आनंदी किलबिलाट आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते,
ही बालजत्रा अनेक कारणाने उल्लेखनीय ठरली, याबाबत भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की ही बालजत्रा केवळ या दिवसापूर्वीची मर्यादित नसून मुलांच्या सुरक्षित आणि संस्कारक्षम भविष्यासाठी आम्ही सुरू केलेली एक सुवर्णपरंपरा आहे. आपल्या चिमुकल्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यातही अविरतपणे सुरू राहील. त्यामुळे या सातत्यपूर्ण प्रवासात सर्वांनीच सक्रिय सहभाग घ्यावा आणि ही परंपरा अधिक मजबूत करावी.









