spot_img
spot_img
spot_img

माजी नगरसेवक प्रसादशेट्टी यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात संपन्न

माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास अनेक मान्यवरांची हजेरी

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक तथा शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रसाद शेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावून प्रसाद शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,

सक्षम नेतृत्व, प्रेमळ व संयमी स्वभाव, सामाजिक कर्तुत्व यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रामुख्याने युवकांचे प्रेरणास्थान असलेले प्रसाद शेट्टी यांचा वाढदिवस आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने नृत्य अविष्काराचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता. यामधील सीने गीतांवर थिरकणाऱ्या नृत्याचा आनंद शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी घेतला,

प्रसाद शेट्टी यांना शुभेच्छा देण्यासाठी आकुर्डी दत्तवाडी, विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर, विवेकनगर, तुळजाई वस्ती, मोहन नगर, काळभोर नगर, रामनगर, साईबाबा नगर, आनंदनगर, रामनगर या सहित शहरातील कानाकोपऱ्यातील आबालवृद्धापसून ते प्रतिष्ठित मान्यवर आणि राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.या अभिष्टचिंतन सोहळ्यास शहरातील अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली यामध्ये प्रामुख्याने विधानसभेचे उपसभापती तथा पिंपरी विधानसभेचे आमदार मा.अण्णासाहेब बनसोडे, संसदरत्न खासदार मा.श्रीरंग अप्पा बारणे, चिंचवड विधानसभेचे आमदार मा.शंकरशेठ जगताप, विधान परिषदेचे आमदार मा.अमितजी गोरखे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा.योगेश जी बहल माजी महापौर मा.मंगलाताई कदम, माजी उपमहापौर मा.राजू मिसाळ, माजी उपमहापौर तुषार हिंगे, उद्योजक आणि शहराचे मार्गदर्शक मा.उमेशभाऊ चांदगुडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे ,कुणाल लांडगे, शीतल शिंदे,सद्गुरू कदम, विनायक गायकवाड, समीर मसुळकर, उल्हास शेट्टी, जगदीश शेट्टी, उर्मिला ताई काळभोर, धनंजय काळभोर, कामगार मेटे तथा शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद,बाबूभाई शेट्टी या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच प्रसाद शेट्टी यांच्या मित्र परिवारा वतीने प्रसाद शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी प्रसाद शेट्टी यांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले.

अभिष्टचिंतन सोहळ्यातील काही क्षणचित्रे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!