spot_img
spot_img
spot_img

महापालिका निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन

सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला होणार सुनावणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे या निवडणुका पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर आता सुप्रीम कार्ट सुनावणी घेणार आहे. ही सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.सुप्रीम कोर्टाने याबाबत सहमती दर्शवली आहे.

याचिकेवर १४ नोव्हेंबर शुक्रवारी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव तसेच महसूल व नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांच्या आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा आखून देत सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये ऐतिहासिक निकाल दिला. . त्या आरक्षण मर्यादेचे महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लंघन झाले आहे, असा दावा करीत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली.

त्यांच्या याचिकेची शुक्रवारी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित करीत खंडपीठाने याचिकेत प्रतिवादी असलेल्या राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह महसूल आणि नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती. दरम्यान, आता या याचिकेवर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!